मुंबई : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन २०२३ सालासाठीच्या सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.
राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या सुट्ट्या पुढील प्रमाणे
जानेवारी : २६ जानेवारी गुरुवार : प्रजासत्ताक दिन
फेब्रुवारी : १८ फेब्रुवारी शनिवार,: महाशिवरात्री, १९ फेब्रुवारी रविवार : छत्रपती शिवाजी महाराज जयंती
मार्च : ७ मार्च मंगळवार : होळी (दुसरा दिवस) , २२ मार्च बुधवार: गुढीपाडवा, ३० मार्च गुरुवार : रामनवमी
एप्रिल : ४ एप्रिल मंगळवार : महावीर जयंती, ७ एप्रिल शुक्रवार : गुड फ्रायडे, १४ एप्रिल शुक्रवार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
मे : १ मे सोमवार : महाराष्ट्र दिन, ५ मे शुक्रवार : बुद्ध पौर्णिमा
जून : २८ जून बुधवार : बकरी ईद (ईद उल झुआ)
जुलै : २९ जुलै शनिवार : मोहरम
ऑगस्ट: १५ ऑगस्ट मंगळवार : स्वातंत्र्य दिन, १६ ऑगस्ट बुधवार : पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)
सप्टेंबर : १९ सप्टेंबर मंगळवार : गणेश चतुर्थी, २८ सप्टेंबर गुरुवार : ईद-ए-मिलाद
ऑक्टोबर : २ ऑक्टोबर सोमवार : महात्मा गांधी जयंती, २४ ऑक्टोबर मंगळवार : दसरा (विजयादशमी)
नोव्हेंबर : १२ नोव्हेंबर रविवार : दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन), १४ नोव्हेंबर मंगळवार : दिवाळी (बलिप्रतिपदा), २७ नोव्हेंबर सोमवार : गुरुनानक जयंती
डिसेंबर : २५ डिसेंबर सोमवार : ख्रिसमस
वरील प्रमाणे राज्य शासनाने सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. राज्य शासनाने आता भाऊबीज, बुधवार दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे.
बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल २०२३ , शनिवार सुट्टी असून ती केवळ बँकांपुरती मर्यादित आहे. ही सुट्टी शासकीय कार्यालयांना लागू होणार नाहीत. या सार्वजनिक सुट्ट्यांबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.