-बापू मुळीक
सासवड : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित, ‘गुरुकुल पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सासवड या विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मंगळवारी (दि.24 डिसेंबर) रोजी आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन सासवड या ठिकाणी संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक स्व. चंदूकाका जगताप तसेच साने गुरूजी जयंतीचे औचित्य साधून प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांनी भूषविले. तसेच, पुरंदर रोटरी क्लबचे अध्यक्ष अभिजीत बारवकर, विश्वनाथ गायकवाड, संदिप टिळेकर (संस्थापक अध्यक्ष गुरुकुल अकॅडमी) तसेच संस्थेचे सहसचिव डी. एन. गवळी, सुधाकर जगदाळे सर (उपाध्यक्ष सेकंडरी स्कूल एम्पलॉइज सोसायटी लिमिटेड, मुंबई ) संस्थेचे व्यवस्थापक मा. के. डी. अमराळे, सचिन सोनवणे (उद्योजक), गीता सोनवणे,(शाळा व्यवस्थापन समिती सदस्या), बेलसरे मॅडम, (मुख्याध्यापिका, जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, जेजुरी), प्रकाश जगताप (मुख्याध्यापक सासवड नगरपालिका शाळा क्र 6) पत्रकार- बापूसो मुळीक आदी मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.
गुरुकुल विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रिया गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक हाके व्ही.टी.सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यालयातील इयत्ता दहावीतील मार्च 2024 परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचे सत्कार करण्यात आले.
पुरंदर तालुक्यात प्रथम व विद्यालयात प्रथम अवंती विजय शिंदे 98.20 टक्के, पुरंदर तालुक्यात तृतीय विद्यालयात द्वितीय आदिती शहाजी जाधव 97.40 टक्के, विदयालयात तृतीय वैभवी गणेश पंडित 97.20 टक्के कार्यक्रमांमध्ये ऐतिहासिक नाटिका तसेच मराठी व हिंदी चित्रपटातील बहारदार गीते यांचा समावेश करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सस्ते सर, भोई सर ,फडतरे मॅडम, घारे मॅडम, सोनवणे मॅडम, वृषाली सस्ते यांनी केले. तर आभार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम यांनी केले. तसेच सर्व विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.