पुणे प्राईम न्यूज : हिवाळा आपल्या प्रकृतीसाठी लाभदायक ठरतो, तसा तो त्वचेच्या समस्याही निर्माण करु शकतो. म्हणून हिवाळ्यात त्वचेची काळजी घेतली नाही तर त्वचेवर सुरकुत्या येतात. एवढेच नव्हे तर त्वचेला भेगा पडून त्वचा वारंवार कोरडी पडू लागते.
हिवाळ्यात त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेऊन देखील काहीवेळा आपली त्वचा कोरडी पडते. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना आपण काही छोट्या चुका करतो, या चुकांमुळेच आपली त्वचा हिवाळ्यात कोरडी पडते. अशावेळी त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी हे उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतील.
अशी घ्या काळजी….
-कोमट पाण्याने स्नान करावे.
-स्नान झाल्यानंतर लगेचच शरीराला मॉइश्चराझर किंवा तेल लावावे.
-आहारात जीवनसत्त्व ई असलेल्या पदार्थाचे सेवन करावे.
-आहारात तूप, तेल, सुकामेवा याचे प्रमाण वाढवावे.
-कोरड्या त्वचेबरोबर खाज सुटत असल्यास त्वचाविकार असू शकतो. ही बाब त्वचाविकार तज्ज्ञाला दाखवून औषधे घ्यावीत.