IND vs AUS 4th Test : कसोटी क्रिकेटमधील सर्वात रोमांचक अशा सामन्यापैकी एक असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना उद्या खेळवला जाणार आहे. मेलबर्नच्या स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. अशातच एक दिवस आधीच ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. टीम सिलेक्शनवेळी ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने एका 19 वर्षाच्या पोराला टीम इंडियाविरुद्ध उभं केलं आहे.
पहिल्या तिन्ही सामन्यात फेल ठरणाऱ्या नॅथन मॅकस्वानीला डच्चू देण्यात आला आहे. नॅथन मॅकस्वानी याच्या जागी 19 वर्षांच्या सॅम कोन्स्टास याला संघात पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सॅम कोन्स्टास हा बॉक्सिंग डे टेस्टमध्ये खेळताना दिसेल. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा हा डाव किती यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
ट्रेव्हिस हेड तंदरुस्त..
ट्रेव्हिड हेड गाबा टेस्ट दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो दोनही टेस्ट खेळणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र आता दोन्ही टेस्टसाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाची डोकेदुखी वाढणार हे मात्र निश्चित मानलं जात आहे.
ऑस्ट्रेलियन संघाची प्लेइंग 11 : पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकिपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, अभिमन्यू इसवरन, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, तनुष कोटियान, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.