पुणे: भीमथडी जत्रेतील एका स्टॉलमधून ७१ हजारांची रोकड चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी सोमवारी (दि. २३) अटक केली. मनोज पवार (वय ४१), संदीप गौड (वय ३२), रतीलाल परमार (वय ५५), विकी साळुंखे (वय ३५, चौघे रा. जामखेड, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
यासंदर्भात एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेशखिंड रस्त्यावरील सिंचननगर मैदानावर भीमथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले. तक्रारदार महिलेने भीमथडी जत्रेत विविध वस्तू विक्रीचा स्टॉल लावला होता. तेथून ७१ हजार रुपयांची रोकड आरोपी पवार, गौड, परमार, साळुंखे यांनी लांबवली.