नवी मुंबई : वाहनाचा अपघात घडल्यास जीवदान देणाऱ्या एअरबॅगने एकाच जीव गेला आहे. नवी मुंबईतील वाशी येथील विचित्र अपघात घडला आहे.आपला प्रवास सुरक्षित होण्यासाठी कारमधील एअरबॅग महत्वाचा घटक आहे. पण याच एअरबॅगमुले एका सहा वर्षाच्या मुलाचा जीव गेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवी मुंबईतील एका विचित्र अपघाताची ही घटना आहे. वाशी सेक्टर 15 मध्ये राहणारे मावजी अरेठीया सहा वर्षाचा मुलगा हर्ष आणि तीन पुतण्यांना घेऊन रात्री फेरफटका मारण्यासाठी गेले होते. वाशीच्या ब्लू डायमंड चौकात त्यांच्या पुढील कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकली. या धडकेत कारचे मागील चाक उडून मावजी यांच्या कारच्या बोनेटवर जोरात आदळले.
मोठा धक्का बसल्याने मावजी यांच्या कारचे दोन्ही एअरबॅग उघडले गेले. त्याचा जोरदार झटका पुढील सीटवर बसलेल्या हर्षला बसला. बेशुद्ध पडलेल्या हर्षला रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एअरबॅग उघडताच माने जवळ झटका बसल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त केला जात आहे.
लहान मुलं प्रवास करत असतील तर कार मध्ये चाईल्ड रिस्ट्राईन्ट सिस्टिम अथवा बेबी कार चेयर बसवून घ्यावी, अशी सूचना आरटीओ अधिकाऱ्यांनी केली आहे. लहान मुलांना कारमध्ये पुढे बसवताना काळजी घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांनी याबाबत वाहनचालकांना काही सुचना केल्या आहेत. या अपघात प्रकरणी कारचालक विनोद पाचडे यांच्या विरोधात बेदरकारपणे गाडी चालविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कारमध्ये लहान मुलं असतील तर पालकांनी सतर्क राहणं गरजेचे आहे. तज्ञांनी सांगितलेल्या सुचना तुम्ही पाळल्यात तर तुमचा प्रवास आनंदाचा आणि सुरक्षित होईल.
Navi Mumbai accident,