मुंबई : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपचा व्यवसाय मोठा आहे. अनेक क्षेत्रात हा व्यवसाय पुढे जाताना दिसत आहे. आता वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अदानी ग्रुपने एक मोठी डील केली आहे. या अंतर्गत अदानी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजिज् लिमिटेडने एअर वर्क्स इंडियामधील बहुतांश भागभांडवल खरेदी केला आहे.
गौतम अदानी यांनी घेतलेली एअर वर्क्स कंपनी ही भारतातील आघाडीची खासगी विमान मेन्टनन्स कंपनी आहे. ही अदानी ग्रुपच्या कंपनी अदानी डिफेन्स सिस्टीम अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ADSTL) द्वारे केले गेले आहे आणि या कंपनीची एंट्री विमान देखभाल आणि ओव्हरहॉल (MRO) उद्योगात अदानी ग्रुपची एंट्री झाली आहे. अदानी ग्रुपने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हा संपूर्ण करार 400 कोटी रुपयांमध्ये झाला आहे.
कंपनीतील 85% पेक्षा जास्त हिस्सा विकत घेतला आहे. 400 कोटी रुपयांच्या या डीलद्वारे, अदानी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेडने एअर वर्क्समधील 85.8 टक्के भागभांडवल खरेदी केले आहे आणि करारांवर स्वाक्षरी केली आहे. यासंदर्भात अदानी समूहाकडून निवेदन जारी करून माहिती देण्यात आली आहे.