पुणे प्राईम न्यूज : हिवाळा सुरु झाला की थंड वातावरणात एकदम प्रसन्न वाटते पण त्याचबरोबर उबदार राहणे आणि स्टायलिश दिसणे या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात. अशा गारव्यात त्वचा तसेच शरीराचे संरक्षण व्हावे यासाठी योग्य कपडे असणे गरजेचे आहे. स्टाईलिश लूक तसेच थंडीपासून संरक्षण देणारे काही टिप्स नक्कीच ट्राय करता येतील.
-हिवाळ्यातील कपड्यांचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बेस लेयर. हे तुमच्या उबदारपणाचे मुख्य स्त्रोत असतात.
-हिवाळ्यात थर्मल कपडे वापरावेत. मेरिनो वूल किंवा सिंथेटिक थर्मल फॅब्रिक्स जास्त प्रभावी असतात कारण ते उबदार ठेवतात आणि त्वचेला ओलावा जाणवू देत नाहीत.
-हिवाळ्यात स्वेटर घालणे आवडत असेल तर लूज आणि स्टायलिश स्वेटर हा एक पार्याय असू शकतो. असा लूक स्टाईलिश वाटतो. तसेच स्वेटरमुळे शरीरात गर्मीदेखील राहते. फ्रील स्टाईल स्वेटर, स्टाईलिश स्लीव्ह्स असणारे स्वेटर परिधान करता येतात.
-साडीवर जॅकेट हे वाचून जरा वेगळं वाटत असेलपण हा ट्रेण्ड सध्या खूपच इन आहे. तुम्ही जर एखाद्या लग्नात शिफॉन, सिल्क अशी साडी नेसणार असाल तर त्या साडीवर तुम्ही एखादं एलिगंट लूक असणार जॅकेट घालू शकता.
-आउटर लेयर हे हिवाळ्यातील तुमच्या पोशाखाचे मुख्य भाग असतात आणि हे तुमच्या उबदारपणासाठी खूप महत्त्वाचे असतात.
-एक चांगला, लांब कोट हिवाळ्यात आवश्यक असतो. वूल कोट्स, पी-कोट्स, किंवा टेलर्ड ट्रेंच कोट्स स्टायलिश आणि उबदार असतात.