उल्हासनगर : उल्हासनगर येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. प्रेयसीच्या भावाला चुगली केल्याच्या रागातून प्रियकर मित्राने त्याच्याच मित्राला कड्याने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना उल्हासनगर येथील सपना गार्डन शेजारी घडली होती. या प्रकरणी पवन खटिजा याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीच्या प्रियकराचे रौनक असे नाव आहे. पवन आणि रौनक कॉलेज पासुन एकमेकांचे मित्र आहेत. कॉलेजमध्ये असल्यापासूनच तो एका मुलीशी बोलायचा, आणि त्या मुलीचा भाऊ देखील आमच्याच ग्रुपमध्ये होता. तिच्या भावाला बाहेरुन कुठूनतरी कळाले की, मी त्याच्या बहिणीसोबत बोलतो. तर त्याने त्याच्या बहिणीला रौनकशी बोलू नको असे सांगितले. तसेच म्हणाला की, हा मुलगा खूप टपोरी आहे.
दरम्यान, मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले. मित्राने चुगली केल्याचा राग रौनकच्या मनात होता की, मुलांना घेऊन त्याला बेदम मारायचं. त्यावेळी त्याने पवनला सपना गार्डनकडे बोलावून हातातील कड्याने तसेच काठीने मारहाण केली. ही घटना तेथील सिसिटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेला १५ दिवस उलटूनही पोलीसांनी रौनक शर्मा विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचा आरोप पवन खटिजा याने केला आहे.