पुणे : मुंबई येथील जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेत आता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 15 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 60000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी.
– रिक्त पदे : 15 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा 60000 रुपये
– वयोमर्यादा : कमाल 70 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकली (पू), मुंबई – ४०००१२.