पुणे : यूजीसी नेट डिसेंबर सत्राच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार नेट डिसेंबर २०२४ ची परीक्षा १ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत होणार होती. परंतु, आता प्रसिद्ध केलेल्या विषयनिहाय वेळापत्रकानुसार परीक्षा ३ जानेवारी २०२५ पासून सुरू होईल आणि १६ जानेवारीला संपणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नव्याने जाहीर केलेल्या विषयनिहाय वेळापत्रकानुसार ८५ विषयांसाठी ही परीक्षा ३ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. शेवटची परीक्षा १६ जानेवारी २०२४ रोजी घेतली जाईल. परीक्षा दोन सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत असेल. दुसरे सत्र दुपारी ३ ते असकार पार आहे परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना https:/// ugcnet. nta. ac. in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन वेळापत्रक पाहता येणार आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षेसाठी परीक्षा सिटी स्लिप जारी करण्याच्या तारखेबद्दल देखील माहिती दिली आहे. एनटीएने स्पष्ट केले आहे की, परीक्षेसाठी परीक्षेचे शहर तपशील परीक्षेच्या फक्त आठ दिवस आधी जाहीर केले जातील. या आधारावर ३ जानेवारी २०२५ पासून परीक्षा सुरू होणार असेल तर २७ डिसेंबर २०२४ पर्यंत सिटी स्लिप जाहीर केली जाईल.
असे आहे नेट परीक्षेचे वेळापत्रक
- ३ जानेवारीला पहिल्या सत्रामध्ये सार्वजनिक प्रशासन आणि दुसऱ्या सत्रामध्ये अर्थशास्त्र.
- ६ जानेवारीला कॉम्प्युटर सायन्स, बंगाली, चायनीज, राजस्थानी आणि इतर विषयांच्या परीक्षा घेतल्या जातील. त्याचबरोबर राज्यशास्त्रासह इतर विषयांच्या परीक्षा दुसऱ्या सत्रामध्ये होणार आहेत.
- ७ जानेवारीला दुसऱ्या सत्रामध्ये वाणिज्य, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी, सामाजिक कार्य यासह इतर विषयांच्या परीक्षा होतील.
- गृहविज्ञान आणि संगीत विषयांची परीक्षा ८ जानेवारीला घेण्यात येणार आहे.