बारामती: बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची तत्काळ हकालपट्टी करून त्यांना अटक करावी, अशी मागणी मराठा बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदन समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा अडसर मंत्री धनंजय मुंडे यांना होता.
त्यामुळेच परळीत आपल्या मंत्रिमंडळातील नेत्याने वाल्मीक कराड याच्यामार्फत देशमुख यांची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. आपल्या मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे हे गुन्हेगारांचे नेते आहेत. म्हणून त्यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी आणि त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली आहे.