मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भाजपची सत्ता असलेल्या एका राज्यातील महिलांसाठीच्या योजनेत चक्क सनी लिओनी लाभार्थी असल्याचे समोर आले आहे.
छत्तीसगड सरकारच्या ‘महतरी वंदन योजना’ या योजनेची लाभार्थी म्हणून सनी लिओनीच्या नावावर पैसे पाठवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर या संपूर्ण प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. यावरुन आता राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, चुकीच्या नावावर निधी वर्ग केला जात असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.
महतारी योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी लाभार्थ्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बॅंक खाते पासबुक आवश्यक आहे. त्याची पडताळणी केल्यानंतर अंगणवाडी सुपरवायझरकडून मंजुरी दिली जाते. पण त्यानंतरही छत्तीसगढमधील बस्तर जिल्ह्यात थेट सनी लिओनीचे नाव योजनेत आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
छत्तीसगढ़ सरकार के लिए यह गौरव का विषय है कि दुनिया के सबसे Flawless/Fine/Natural अभिनेत्री श्रीमती Sunny Leone जी को महतारी वंदन योजना का लाभ देने का सौभाग्य मिला ।
लेकिन यह मेरे लिए एक दुर्भाग्य का विषय है कि Sunny Leone जी बस्तर के निवासी होने के बावजूद भी मुझे Sunny Leone व… pic.twitter.com/03pTzRJj5Z— भावी शिक्षक मंच छत्तीसगढ़ (@CgObc) December 22, 2024
नेमकं प्रकरण काय
हे प्रकरण राज्यातील बस्तर भागातील आहे. येथे महतारी वंदन योजनेचा लाभ सनी लियोन घेत आहे. सरकारच्या महतारी वंदन योजनेच्या वेबसाइटवर याच नावाने लाभार्थ्याची नोंद आहे. वेबसाइट नोंदणी क्रमांक MVY006535575 प्रविष्ट केल्यावर लाभार्थ्याचे नाव सनी लिओन असे दिसते, तर तिच्या पतीचे नाव जॉनी सिन्स दिसते. गेल्या 10 महिन्यांपासून सनी लिओन नावाच्या लाभार्थीच्या खात्यात दरमहिन्याला 1000 रुपये जात आहेत.