-बापू मुळीक
सासवड : दोन वर्षांपूर्वी हरगुडे येथील ग्रामस्थांनी बालाजी स्टोन क्रशरबंद करून, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालया शेजारी जे उपोषण केले होते. त्यासाठी नवीन खडी क्रशर ही शेजारील गटात सुरू करण्याचा प्रकाश चव्हाण व धनंजय खेंगरे यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. त्यामुळे एक प्रकारची ग्रामस्थांची संतापाची लाट उसळली होती.
याप्रसंगी ग्रामस्थांनी मंडल अधिकारी बी. एन. देवकर यांना निवेदन दिले. या प्रकल्पास विरोध करणारे हरगुडे, पिलानवाडी, खेगरेवाडी या ठिकाणचे ग्रामस्थ व बाधित शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. पर्यावरणाला हानी करणाऱ्या या उद्योगाला प्रत्येक वेळी विरोध करून, सुद्धा जर नवीन क्रशर पुन्हा चालू करण्याचा जो कोणी प्रयत्न करत असेल, तर त्याची चौकशी करावी.
जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंद केलेल्या विरोधात देवकर यांनी हे निवेदन हरगुडे या ठिकाणी सरपंच भूषण ताकवले व ग्रामस्थांनी त्यांना सादर केले. पर्यावरण विभागाच्या नियमानुसार खानपट्ट्यांची नैसर्गिक प्रवाह ओढा, नाला, नदी यांचे अंतर 500 मीटर असणे आवश्यक आहे. जागेच्या ठिकाणी ओढा आहे. 200 मीटरवर तीन प्रकारच्या विहिरी आहेत. पिलानवाडी, खेंगरेवाडी गावठाणात सातशे मीटर अंतरावर, तर घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे जीवित व वित्तहानी होऊ शकते. गट नंबर 571 मध्ये यापूर्वी सुद्धा बालाजी स्टोन क्रशर चालू होता. त्यामुळे तर घरांना तडे गेले आहेत. विहिरीची पाणी पातळी खालावली आहे.
हरीण, मोर, वानर, लांडगा या प्राण्यांना क्रशरमुळे धोका निर्माण झाला आहे. खेगरेवाडी व पिलानवाडी या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनी बागायती आहेत. तसेच हरगुडे मधील सुद्धा जमिनी या बागायती आहेत. गट नंबर 571 मध्ये पूर्वी चाललेल्या क्रशरमुळे जमिनी नापीक झाल्या होत्या. त्या कशातरी आता शेतकऱ्यांनी पुन्हा आपली पिके करायला सुरुवात केली आहे तर हा पुन्हा घाट घातला आहे. याकडे मंडल अधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी ही प्रमुख भूमिका घेतली.
यावेळी सरपंच भूषण ताकवले, प्रमोद ताकवले, सुरेश ताकवले, राजेंद्र ताकवले, चंद्रकांत यादव, बबन ताकवले, तानाजी खेगरे, महेश ताकवले, नितीन यादव, सुशील ताकवले, तुकाराम ताकवले, सचिन ताकवले, काका पिलाने, दादा पिलाने आदी उपस्थित होते.