संतोष पवार
पळसदेव (ता .इंदापूर): ५१व्या कुमारगट मुलांच्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या प्रशिक्षकपदी पळसदेव (ता .इंदापूर) येथील सिकंदर देशमुख आणि मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी सागर बनसुडे यांची निवड झाल्याची माहिती पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह दत्तात्रय झिंजुर्डे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने युवक मराठा क्रीडा मंडळ सांगली यांच्या वतीने 28 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 या कालावधीत चिंचबागमैदान (सांगलीवाडी) सांगली या ठिकाणी 51 वी कुमारगट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी पुणे ग्रामीण विभागासाठी प्रशिक्षक म्हणून पळसदेव येथील श्री पळसनाथ विद्यालयातील क्रीडाशिक्षक सिकंदर देशमुख आणि एस.बी. स्पोर्ट्स ॲकॅडमी, पळसदेवचे अध्यक्ष व क्रीडाशिक्षक सागर बनसुडे यांची निवड करण्यात आली आहे.