नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून तंबाखू, सिगारेट आणि तत्सम उत्पादनांवर अनेक उत्पादनांवर जीएसटी लावण्यात येत असतो. आता हाच जीएसटी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सिगारेट आणि तंबाखूच्या किमतीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आता तज्ञांनी तंबाखू उत्पादनांवर 35 टक्के ‘सिन टॅक्स’ स्लॅबच्या मंत्रिगटाने (जीओएम) नुकत्याच केलेल्या शिफारशीचे समर्थन केले आहे, जे सध्या 28 टक्के आहे. तंबाखूवरील कर वाढवल्याने अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि निरोगी आणि विकसित भारताची संकल्पना पुढे जाईल, असे मत व्यक्त केले जात आहे. सरकारच्या या पावलामुळे तंबाखू सेवनाला आळा बसेल आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांना निधी मिळू शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, तंबाखूशी संबंधित आजारांमुळे भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर असह्य भार पडतो. तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर करवाढ प्रभावी ठरली आहे. हे सिद्ध झाले आहे. हानिकारक पर्यायांकडे जाण्यापासून रोखण्यासाठी भारताने सर्व तंबाखू उत्पादने मजबूत कराच्या कक्षेत आणली पाहिजेत, असेही त्यांनी सुचवले.
21 डिसेंबरला जीएसटी कौन्सिलची बैठक
21 डिसेंबर रोजी जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे, ज्यामध्ये मंत्री गटाच्या प्रस्तावांवर चर्चा केली जाईल. यामध्ये तंबाखू आणि कोल्ड्रिंक्स सारख्या वस्तूंसाठी 35 टक्के नवीन कर स्लॅब लागू करणे, नोटबुक, बाटलीबंद पाणी आणि सायकल यासारख्या अत्यावश्यक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करणे आणि आरोग्य आणि जीवन विम्यावरील प्रीमियम कमी करणे यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.