नवी दिल्ली : सध्या OpenAI ने चॅटबॉट ChatGPT चा विस्तार केला आहे. हा चॅटबॉट वापरण्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावे लागायचे किंवा वेब वर्जन वापरावे लागत होते. पण, आता तुम्ही हा चॅटबॉट व्हॉट्सॲपवर किंवा कॉलवर ॲक्सेस करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक नंबर डायल करावा लागेल.
याबाबत कंपनीकडून सांगण्यात आले की, सध्या भारताबाहेरील युजर्सना कॉलवर ChatGPT चा फ्रीमध्ये ऍक्सेस मिळणार आहे. मात्र, हा ऍक्सेस केवळ 15 मिनिटांसाठी असणार आहे. ChatGPT सर्व्हिस आधीच उपलब्ध असेल. मात्र, ही सेवा सुरू करण्यासाठी, युजर्सला व्हॉईस कॉलवर दर महिन्याला ChatGPT मध्ये 15 मिनिटांचा ऍक्सेस सुरु करावा लागणार आहे. ChatGPT सह हे चॅटिंग एक प्रायोगिक पद्धत आहे, त्यामुळे उपलब्धता आणि मर्यादा बदलू शकतात, असेही सांगण्यात आले आहे.
OpenAI चे रिअल-टाईम API फोन लाईनवर ChatGPT ऍक्सेस करण्यासाठी वापरले गेले आहे. तर GPT 4o Mini WhatsApp वर उपलब्ध आहे, जो API द्वारे जोडला गेला आहे. याशिवाय, कंपनीने स्पष्ट केले की, ज्यांना लेटेस्ट फीचर्स, युसेज लिमिट आणि पर्सनल एक्सपिरियंन्स हवा असेल त्यांनी त्यांचे रेग्युलर ChatGPT अकाउंट वापरावे, असेही सांगण्यात आले आहे.