नागपूर : नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान विविध घडामोडींना वेग आला आहे. मागील दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. आता दुस-या दिवशी तासगाव कवठे महांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
रोहित पाटील यांनी भेटीचे कारण सांगताना म्हटले की, माझ्या मतदारसंघातील कामासाठी अजित पवारांना भेट घेत असल्याचे त्यांनी सांगितले. विधीमंडळात गुरुवारी अजितदादांची भेट घेतली होती. पण, या ठिकाणी बोलणं सोयीचे होणार नसल्याचे सांगत त्यांनी सकाळी बंगल्यावर येण्यास सांगितले. त्यानुसार, आज भेट घेत असल्याचे सांगितले. रोहित पाटील यांच्याशिवाय, अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी देखील भेट घेतली.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक होण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू आहे. आज रोहित पाटील आणि सलील देशमुख यांनी आज अजित पवारांची भेट घेतली. या भेटीमागे काही राजकीय कारण नाही ना? अशा चर्चेला सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.