पुणे : ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळ प्रवाशांनी भरलेली बस पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बसमध्ये काही प्रवासी अडकल्याची माहिती समोर येत आहे. अनेकजण गंभीर जखमी झाले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती समजताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी टीमला घेऊन घटनास्थळी निघाले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. थोड्याच वेळात घटनास्थळी पोलीस, अॅम्बुलन्स आणि रेस्क्यू टीम पोहचेल.
या घटनेत जे जखमी झालेले प्रवासी आहेत त्यांनी माणगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.