बापू मुळीक
सासवड: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सासवड (ता. पुरंदर) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. यामध्ये ३६66 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती. त्यातील 380 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. तर एक कोटी तीन लाख 96,447 रुपयाची वसुली झाली.
विविध बँकांच्या 568 प्रकरणापैकी नऊ प्रकरणांमध्ये तडजोड करून 18 लाख 38 हजार रुपये वसुली झाली. ग्रामपंचायत घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकीत 718 प्रकारणांपैकी 290 प्रकरणांमध्ये 21 लाख 64 हजार 696 रुपये वसूल झाले. यासाठी नगरपालिकेचे निखिल कांचन यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची 650 प्रकरणे होती. न्यायालयातील दिवाणी व फौजदारी 1हजार 690 प्रकारणांपैकी 81 प्रकरणे निकाली निघाली.