-अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : गणेरी येथे अवैध रेती भरलेला ट्रक महसुल विभागाने पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (19 डिसेंबर) मध्यरात्री करण्यात आली.
घाटंजी तहसील कार्यालयाचे तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा गणेरी येथे विनापरवाना अवैध रेती वाहतुक करणारा MH27 X 5380 क्रमांकाचाचा एक ट्रक अवैध रेती वाहतूक करताना महसुल विभागाने ताब्यात घेतला. तसेच सदर ट्रक पुढील कारवाईसाठी पारवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला.
सदर कारवाई मंडळ अधिकारी पि.आर. कांबळे, तलाठी डी. एम. किनाके, तलाठी आर. जी. राठोड, तलाठी रामेश्वर कुमरे या वेळी उपस्थित होते.
याबरोबरच गुरुवारी (दि.19 डिसेबंर) रोजी दुपारी घाटंजी चे तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल नायब तहसीलदार अरुण भिसे यांनी मौजा मानोली येथे विनापरवाना अवैध रेती वाहतुक करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. तसेच पुढील कारवाई साठी घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आले.
सदर कारवाई मंडळ अधिकारी आर. जी. शिंदे, अनिल येरकार, तलाठी नवीन खोब्रागडे, अतुल खोब्रागडे, पि. बि. कार, प्रतिक कनाके, पोलीस पाटील शाम वाढई आदींनी केली.