Pratap Sarangi : गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर संसद परिसरात सत्ताधारी-विरोधकांमध्ये मोठा गदारोळ चालू आहे. अशातच वातावरण तापलेले असताना भाजपा खासदार प्रताप सारंगी हे खाली पडल्याने जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. यानंतर सारंगी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामुळे त्यांना दुखापत झाल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजप खासदारांनी संसदेत निदर्शने केली. या निदर्शनावेळी भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सारंगी यांच्या दाव्यानुसार ते एका ठिकाणी उभे होते. तेव्हा राहुल गांधी यांनी दुस-या खासदाराला धक्का दिला, तो खासदार माझ्यावर कोसळला. यामुळे मी खाली पडलो व माझ्या डोक्याला दुखापत झाली.
प्रताप सारंगी यांच्या आरोपांवर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली, ‘मी संसदेत जात होतो. संसदेत जाण्याचा माझा अधिकार आहे. मला संसदेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपाचे खासदार धक्काबुक्की करत होते. धक्काबुक्कीने काही होत नाही, असा उलट आरोप केला आहे.
ही सर्व घटना गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निषेध आंदोलनादरम्यान घडली.