–बापू मुळीक
सासवड : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथे झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये संगीता इंदलकर यांची चार मताने निवड झाली. माळशिरस गावचे उपसरपंच अशोक यादव यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे, ही निवडणूक घेण्यात आली.
शरद बाळासो यादव, संगीता विठ्ठल इंदलकर व सुखदेव अनंता मराठे या तीन सदस्यांनी उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन भरले होते. परंतु सुखदेव अनंता मराठे यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने, शरद यादव व संगीता इंदलकर यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली. या निवडणुकीमध्ये 12 मतांपैकी संगीता इंदलकर यांना आठ मते मिळाली, तर शरद यादव यांना चार मते मिळाली, निवडणूक निर्णय अधिकारी माळशिरसचे सरपंच आरती यादव यांनी उपसरपंच पदासाठी संगीता इंदलकर यांची निवड जाहीर केली. सचिव म्हणून माळशिरसचे ग्रामपंचायत अधिकारी विलास बडधे यांनी काम पाहिले.
यावेळी सरपंच आरती यादव, उपसरपंच संगीता इंदलकर, माजी उपसरपंच अशोक यादव, ग्रामपंचायत सदस्य दिपक यादव, दिपक यादव ,शरद यादव, सुखदेव मराठे, मंगल मगर, छाया यादव, इंदुबाई कामठे, अर्चना बोरावके, सविता गद्रे तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील पाणी, आरोग्य, रस्ता, निवारा वंचित घटकाला आदी सुविधांमध्ये ज्या काही त्रुटी महिलांच्या, नागरिकांच्या असतील. त्यासाठी मी पूर्णपणे माझा वेळ देऊन, सर्वांना विश्वासात घेऊनच या गावातील शासनाच्या सर्व सुविधा, योजना या सर्व तळागाळापर्यंत, घराघरापर्यंत, पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझ्या कार्यकालामध्ये सर्वांना सहमतीत घेऊनच गावचा विकास येथून पुढे करणार आहे.
-संगीता इंदलकर, नुतन उपसरपंच