मुंबई : मुंबईच्या समुद्रात अपघाताची धक्कादायक घटना घडली. नौदलाच्या बोटीने एका फेरीबोटीला धडक दिली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजुनही काही प्रवासी बेपत्ता आहे. दरम्यान, या प्रकरणी स्पीड बोटवरील चालक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. ज्या व्यक्तीने बोट धडकली तो व्हिडीओ काढला त्याच व्यक्तीची FRI नोंदवून घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवासी नाथाराम चौधरी यांनी ज्या व्यक्तीने बोट धडकली तेव्हाचा व्हिडीओ शूट केला होता. नाथाराम चौधरी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पीड बोटवरील चालक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे.
नौदलाच्या स्पीड बोट विरोधात नीलकमल बोट दुर्घटनेसंदर्भात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये सीआर क्र 283/24 अन्वये 106(1), 125 (अ) (ब), 282, 324 (3)(5) BNS नुसार एफआयआर नोंदवण्यात आला असून स्पीड बोट चालक आणि जबाबदार इतरांवर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बुधवारी झालेल्या या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 101 जणांना वाचवण्यात यश आले. जेएनपीटी रुग्णालयात रुग्णांवर उपचार झाले. काही जणांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. तर काही जणांवर उद्याप उपचार सुरु आहे.