पुणे : उल्हासनगर येथील महानगरपालिकेत आता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला उल्हासनगर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.umc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी.
– नोकरीचे ठिकाण : उल्हासनगर, ठाणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 23 डिसेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : उल्हासनगर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, तळमजला, उल्हासनगर, 421003.