मुंबई : उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपने सिमेंट व्यवसायात मोठे बदल केले जात आहेत. अदानी ग्रुपच्या मालकीच्या अंबुजा सिमेंट या सिमेंट कंपनीमध्ये दोन मोठ्या कंपन्यांचे विलीनीकरण झाले आहे. संघी इंडस्ट्रीज आणि पेन्ना सिमेंट या कंपन्या गौतम अदानी यांच्या सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंटमध्ये विलीन झाल्या आहेत.
सिमेंट व्यवसायात हे मोठे बदल झाल्याचे दिसून आले. या विलीनीकरणानंतर संघी सिमेंटचे शेअर 77 रुपयांवर व्यवहार करत होते. अदानी ग्रुपने नुकत्याच विकत घेतलेल्या संघी इंडस्ट्रीज आणि पेन्ना सिमेंटचे अंबुजा सिमेंटमध्ये विलीनीकरण केले जाणार आहे. सिमेंट व्यवसायाला एकाच संस्थेत समाकलित करण्यासाठी समूह हे पाऊल उचलत आहे. अंबुजा सिमेंटने सौराष्ट्र-आधारित संघी इंडस्ट्रीज (SIL) आणि आंध्र प्रदेश-आधारित पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेड (PCIL) च्या विलीनीकरणासाठी स्वतंत्र योजना जाहीर केल्या.
दरम्यान, या विलीनीकरणामुळे अदानी यांच्या सिमेंट युनिटला अधिग्रहित युनिट्सच्या एकत्रित ताकदीचा फायदा घेण्यास मदत होईल. अदानी ग्रुपचा सिमेंट ग्रुप या क्षेत्रातील बाजार प्रमुख आदित्य बिर्ला समूहाच्या अल्ट्राटेक सिमेंटशी स्पर्धा करताना दिसत आहे.