हिवाळ्यात हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. विशेषत: हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण याचदरम्यान जास्त असते. त्यामुळे काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे बनते. त्यात आपल्या निसर्गातील अशी एक गोष्ट आहे ती हार्ट अटॅकपासून वाचवू शकते.
आपल्या स्वयंपाकघरात असलेली गोड आणि आंबट चिंच हिवाळ्यात हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करू शकते. याशिवाय चिंच केवळ रोगप्रतिकारशक्ती मजबूत करत नाही तर कॅन्सरपासून बचाव करण्यासाठीही प्रभावी आहे. चिंचेत कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्म असतात. हिवाळ्यात कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने शिरांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका असतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. पण चिंचेच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी करता येते.
चिंचेमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करतात. त्यामुळे शरीरातील पेशी सुरक्षित राहतात, तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोकाही कमी होतो. याशिवाय चिंचेमुळे जळजळ कमी होते, जी शरीराची प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक असते.