मुंबई : मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी बोट उलटल्याची घटना घडली आहे. या बोटमध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर जीवरक्षक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून प्रवाशांसाठी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उरण, कारंजाजवळ ‘नीलकमल’ ही फेरीबोट उलटली आहे. त्यात 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. नौदल, तटरक्षक दल, यलोगेट पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक मासेमारी नौकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.. ही बोट उलट्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या जीवरक्षकाकडून तातडीने प्रवाशांना पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. एलिफंटाकडे दररोज पर्यटकांचा ओढा असतो. त्यामुळे दररोज शेकडो नागरिक एलिफंटा या ठिकाणी जात असतात. दरम्यान, या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
एका प्रवाशाचा मृत्यू
मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोटमध्ये 56 प्रवासी प्रवास करत होते. त्याचबरोबर तटरक्षक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार 21 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी 1 प्रवाशी मृत घोषित करण्यात आला आहे.
According to preliminary information, the ferry boat ‘Neelkamal’ has capsized near Uran, Karanja. Preliminary information is that there are 30 to 35 passengers in it. Rescue operations are underway with the help of Navy, Coast Guard, Yellowgate Police Station and local fishing…
— ANI (@ANI) December 18, 2024