मुंबई : शेअर मार्केटमध्ये चढउतार जरी होत असले तरी त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यातच 2024 हे वर्ष IPO मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी उत्तम वर्ष ठरले आहे. अनेक कंपन्यांचे इश्यू एकामागून एक सुरू झाले आहेत, ज्यापैकी अनेकांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. आता वर्षाच्या शेवटच्या महिन्यातही आयपीओ मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
एक IPO ग्रे मार्केटमध्ये कहर करताना दिसत आहे आणि त्याचा GMP 405 रुपयांवर गेला आहे. मात्र, या इश्यूमध्ये पैसे गुंतवण्याची शेवटची संधी झाली. Inventurus Knowledge Solutions असे या IPO चे नाव आहे. मेनबोर्ड श्रेणीतील Inventurus Knowledge Solutions चा IPO 12 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडण्यात आला होता आणि 16 डिसेंबरला बंद झाला.
गुंतवणूकदार त्यात पैसे गुंतवू शकतात. इश्यू अंतर्गत, कंपनीने 1 रुपयाचे दर्शनी मूल्य असलेले 1,87,95,510 शेअर जारी केले आणि त्यांचे एकूण मूल्य रु 2,497.92 कोटी आहे. या IPO ला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसादही मिळाला होता.