पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथे वरिष्ठ संशोधन अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया 16 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. असे जरी असले तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर ही असणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 70 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.tiss.edu/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.