नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme कडून आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली जात आहे. त्यात हा स्मार्टफोन बुधवारी (दि.18) लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून अनेक विशेष असे फीचर्स देण्यात आले आहेत. हा एक 5G फोन असणार आहे.
Realme कडून Realme 14x स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोनला टीझ करून लाँचिंग इव्हेंटची माहिती दिली आहे. Realme 14X 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच फुल एचडी + एलसीडी डिस्प्ले मिळू शकणार आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल असून, पीक ब्राइटनेस 1000 nits आहे.
या स्मार्टफोनमध्ये बेस्ट कॅमेरा क्वालिटी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी, कंपनी Realme 14x च्या मागील पॅनलवर LCD फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर देण्याची शक्यता आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये अनेक जबरदस्त असे फीचर्स दिले जाणार आहेत.