बंगळुरू : पृथ्वी शॉ जितक्या वेगाने उदयास आला, तितक्याच वेगाने तो जमिनीवर आपटला. मात्र, शिस्तीचे पालन केल्यास मुंबईचा हा फलंदाज यशस्वी होईल, असा विश्वास सय्यद मुश्ताक अली करंडकचा विजेता मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने व्यक्त केला. पृथ्वीसारखे कौशल्य इतर कुणाकडे नाही. त्याला केवळ शिस्तीकडे लक्ष द्यावे लागेल आणि असे केल्यास तो नवीन उंची गाठू शकतो. मात्र, आपली कारकीर्द पुन्हा रुळावर आणण्याची इच्छा स्वतःमध्ये असली पाहिजे, असे अय्यर म्हणाला.