पुणे: पुणे ते मऊ जंक्शनदरम्यान कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवासांची अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. पुणे-मऊ जं. कुंभमेळा (ट्रेन क्रमांक ०१४५५) स्पेशल ट्रेन पुण्याहून सकाळी १० वाजून १० मिनिटांनी निघेल आणि पुढच्या दिवशी रात्री ११ वाजता पोहोचणार आहे. ८ जानेवारी, १६ जानेवारी, २४ जानेवारी २०२५, ६ आणि ८ फेब्रुवारी आणि २१ फेब्रुवारी २०२५ या दिवशी ही गाडी धावणार आहे. तर मऊ-पुणे कुंभमेळा (ट्रेन क्रमांक ०१४५६) विशेष गाडी मऊ येथून रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून तिसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. ही गाडी ९ जानेवारी, १७ जानेवारी, २५ जानेवारी, ७ फेब्रुवारी आणि ९ फेब्रुवारी या दिवशी धावणार आहे.
या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, तलडिया, छनेरा, खिरकीया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, चुनार, वाराणसी, शहागंज आणि आझमगड आदी स्थानकावरही थांबे देण्यात आले आहेत