हडपसर : बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिलेच्याजवळील साडे पाच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर येथील एच पी पेट्रोल जवळ असलेल्या सिध्देश्वर हॉटेलच्या परिसरात रविवारी (ता.15) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याप्रकरणी एका 50 वर्षीय (रा. मु.पो. शिंदफळ, ता. तुळजापुर, जि. धाराशिव) महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या तुळजापुरहून पुण्याला बसमधून निघाल्या होत्या. त्या शनिवारी (ता.14) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बसमध्ये बसल्या होत्या. प्रवास करताना बसमध्ये मोठी गर्दी होती. दरम्यान, बस प्रवासा दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बस मधील गर्दीचा फायदा घेवुन, फिर्यादी महिलेच्या जवळील 5 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रूपये चोरी करून नेले.
याप्रकरणी महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोलीस अंमलदार विशाल गव्हाणे करीत आहेत.