IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून सद्या मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारताच्या चांगलाच अंगलट आला आहे. कारण ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व बाद 445 धावांचा डोंगर उभा केला आहे. यामध्ये स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड यांनी दमदार शतकं ठोकून मोठे योगदान दिले आहे. तसेच एलेक्स कॅरेने 70 धावांची तुफानी खेळी करत भारताला बॅकफूटवर ढकललं.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हाच भारताचा पराभव नजरेस दिसू लागला होता. भारताला यशस्वी जयस्वालच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्याला अवघ्या 4 धावा करता आल्या. त्यानंतर शुबमन गिलही टिकाव धरू शकला नाही. विराट कोहलीही काही विशेष करू शकला नाही. तो 3 धावा करून बाद झाला. ऋषभ पंतलाही मोठी खेळी करता अली नाही. 9 धावांवर असताना पॅट कमिन्सचा शिकार ठरला.
पाऊस आणि खराब प्रकाशमान यांचा अंदाज घेऊन तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. तिसऱ्या दिवशी भारताने 51 धावांवर 4 महत्त्वाचे गडी गमावले आहेत. भारतीय संघ अजूनही 394 धावांनी पिछाडीवर असून त्यामुळे भारताचा फैसला चौथ्या दिवशीच होईल असं दिसू लागलं आहे. भारताकडून केएल राहुल नाबाद 33 आणि रोहित शर्मा नाबाद 0 धावांवर खेळत आहे. चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आणि खेळ झाला नाही तर हा सामना ड्रॉकडे सुद्धा झुकू शकतो. त्यामुळे भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आशा पल्लवित राहतील.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन) : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.
भारत (प्लेइंग इलेव्हन) : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप