पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्तपदी राजकुमार शिंदे यांची नियुक्ती शनिवारी (दि. १४) करण्यात आली आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांची गृहविभागाने दोन दिवसांपूर्वी पोलीस दळवळण, माहिती-तंत्रज्ञान आणि परिवहन विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती केली. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड विभागाचे अधीक्षक राजकुमार शिंदे यांची ऑगस्ट २०२४ मध्ये पुणे पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्तपदी बदली झाली होती. पुण्यात हजर झाल्यानंतर त्यांना शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर शिंदे यांची आता परिमंडळ पाचच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.