धाराशिव : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याबाबात मोठी बातमी समोर येत आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गुडघ्याच्या समस्येमुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती त्यांचे चिरंजीव व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे.
डॉ. पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्याच्या गृहमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. सध्या डॉ. पद्मसिंह पाटील हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांच्यावर पुढील उपचारांसाठी त्यांची नियमित तपासणी सुरु आहे.
यावेळी बोलताना भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले की, “डॉ. पद्मसिंह पाटील यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन ते तीन दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल. तसेच त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे.” असे म्हणाले.