बीड : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बीडमधील के.एस.के. महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर पोहोचताच विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्याचा मृत्यू झाला.
सिद्धांत मिसाळ असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धांत मिसाळ हा बीएसएसी तृतीय वर्षाच्या वर्गात शिकत होता. शुक्रवारी त्याची परीक्षा होती. त्यामुळे तो अभ्यास करुन बीड शहरातील के.एस.के. महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर पोहोचला. हॉलमध्ये गेल्यावर अचानक त्याच्या छातीत दुखायला लागले. आजुबाजूला कोणाला सांगण्याआधीच तो खाली कोसळला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. जिल्हा रुग्णालयात त्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली. यावेळी त्याच्या हृदयाला रक्तपुरवठा करणा-या नसांमध्ये गाठी तयार झाल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला.
दरम्यान, मृत विद्यार्थी सिद्धांत मिसाळ हा दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात गेल्या दीड वर्षापासून फोटोग्राफर म्हणून काम करत होता. मागील 3 दिवसांपूर्वी तो परीक्षा देण्यासाठी बीडमध्ये आला होती. यादरम्यान ही दुर्देवी घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.