नागपूर : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज नागपूरमध्ये पार पडत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इंदापूर मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांची मंत्रिपद पदी निवड झाली आहे. आज त्यांनी नागपूरमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा 19,284 हजार मतांनी दणदणीत पराभव करीत विजयाची हॅट्रिक केली.
घराण्याला राजकीय वारसा नसतानाही निष्ठावान कार्यकर्त्यापासून सामाजिक कामांना सुरुवात करणारे आमदार दत्तात्रय भरणे. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे शेतकरी कुंटूबातील साधे व्यक्तीमत्त्व म्हणून परिचित आहे. कुटूंबाला राजकारणातील घराणेशाहीचा वारसा नाही. केवळ पक्षनिष्ठा व विकासकामांच्या जोरावर आज मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू आमदार म्हणून त्यांची राज्यामध्ये ओळख आहे.
राजकीय कारकीर्द…
1992- संचालक, छत्रपती सहकारी साखर कारखाना
1998- संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक
2000- अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक
2002-अध्यक्ष, छत्रपती सहकारी साखर कारखाना
2009- विधानसभा निवडणुकीत पराभव (अपक्ष)
2012- जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड
2014- राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधानसभेची निवडणूक विजयी
2019- दुस-यांदा विधानसभेमध्ये आमदार
2021- राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री