पुणे : जामीन मंजूर करून देण्यासाठी पाच लाखांची लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला झाला आहे. त्यामधील खासगी व्यक्ती किशोर खरात हे मुंबईमध्ये सहायक फौजदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
न्यायाधीश धनंजय निकम यांच्या घराची झाडाझडती घेतली असल्याची माहिती पुणे लाचलुचपत विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. प्रतिबंधक पुणे येथील एका महिलेच्या वडिलांना सातारा शहर पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तसेच त्यांनी सातारा जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.
हा जामीन अर्ज मंजूर करुन देण्यासाठी ५ लाखांची लाच मिळवण्याचा प्रयत्नही झाला होता. दरम्यान, न्यायाधीश धनंजय निकम यांच्या साताऱ्यातील घरात काही आक्षेपार्ह आढळले नाही, अशी माहितीही पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.