-सागर जगदाळे
भिगवण : इंदापूर तालुक्यातील मौजे शेटफळगढे येथून 22 वर्षीय तरुण विवाहिता राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. घरच्यांनी तिचा आसपासच्या परिसरात शोध घेतला असता ती आढळून आली नाही. म्हणून तिचा पती तुषार दिलीप कुंभार,( वय 27 वर्षे, रा. रकटेवस्ती शेटफळगढे ता. इंदापुर जि. पुणे) यांनी भिगवण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत भिगवण पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेधा उर्फ कोमल तुषार कुंभार, (वय 24 वर्षे, रा. रकटेवस्ती शेटफळगढे ता. इंदापुर जि. पुणे) असे बेपत्ता तरूण विवाहितेचे नाव आहे. ती शनिवारी(दि.14) रात्री बारा वाजल्यापासून ते रविवारी (दि.15) पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान शेटफळगढे मधील रकटेवस्ती येथील राहत्या घरातून कोणाला काहीएक न सांगता निघून गेल्या आहेत. फिर्यादी व त्यांचे नातेवाईक यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे मित्रांकडे तसेच भिगवण, शेटफळगढे, मदनवाडी या परिसरात शोध घेतला असता ती आढळून आली नसल्यामुळे भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कोमल कुंभार यांचे शिक्षण 10 वीपर्यत झाले आहे. उंची 5 फुट, बांधा सडपातळ, रंग गोरा, नाक सरळ, डोकीस लांब केस, चेहरा उभट, गळ्यात मणीमंगळसुत्र, कानात रिंगा, नेसणीस – जांभळ्या कलरचा वनपिस ड्रेस, पायात पैंजन असून मराठी, हिंदी भाषा बोलता येते. तरी सदर वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास भिगवण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी केले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पो. हवा. कर्चे हे करीत आहेत
संपर्क-
भिगवण पोलीस ठाणे – +91 95521 64100
विनोद महांगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक- +919422150050