मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अधिवेशन संपल्यानंतर भुजबळांचा परदेश दौऱ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी मंत्री छगन भुजबळांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष कोर्टानं त्यांना परदेशी जाण्याची परवानगी दिली आहे.
कुटुंबासह परदेशात सहलीला जाण्यासाठी भुजबळांचा पासपोर्ट परत करण्याचे अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) कोर्टाकडून आदेश देण्यात आले आहेत. परदेशी जाण्याची अनुमती दिल्यास भुजबळ पळून जातील, अन्यथा खटला लांबणीवर पडेल, असा दावा ईडीने कोर्टामध्ये केला होता. आता या निर्णयामुळे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर भुजबळांचा कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.