सांगली : आपल्या वर्ग मित्रांना कित्येक वर्षांनंतर भेटण्यात काही वेगळी मजा असते. एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय? कोण काय करत आहे? हे जाणून घेण्याची आणि शाळेत असताना केलेली धमाल पुन्हा आठवायची असेल तर त्यावर गेट टूगेदर हा एक उत्तम पर्याय ठरतो. असाच एक गेट टू गेदर सांगली जिल्ह्यातील नेर्ले गावामधेय पार पडला आहे. सांगली जिल्ह्यातील नेर्ले गावामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या १९७५-७६ वर्षामधील १० वीच्या बॅचचे जवळ जवळ अर्ध शतकानंतर गेट टुगेदर संपन्न झाला. १९७५-७६ या वर्षाच्या १० वीच्या बॅचने हा कार्यक्रम करायचे ठरविले होते. त्यासाठी हंबीर गावडे यांनी घरोघरी जाऊन मुला मुलींचे मोबाईल नंबर गोळा करून आलमगिर नदाफ यांना व्हॉटसप् ग्रुप तयार करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर सर्वांचा एक व्हॉटसप् ग्रुप तयार करण्यात आला.
व्हॉटसप् ग्रुपच्या माध्यमातून ग्रुपवरच चर्चा सुरु झाल्या. अखेर गेट टुगेदरसाठी १ डिसेम्बर २०२४ चा मुहूर्त ठरवण्यात आला. त्यासाठी तुलसीदास पाटील, हणमा संदे, सदाशिव कदम जयवंत पाटील, शिवाजी माने, सर्जेराव माने इत्यादींकडून सगळे नियोजन करण्यात आले. कित्येक वर्षानंतर १० वीच्या वर्गमित्रांची भेट होणार होती. एकमेकांना भेटण्याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती.
अखेर कार्यक्रमाचा दिवस उजळला. सर्वजण सकाळी १० वाजता हायस्कूलमध्ये एकत्र आले. शिवाजी पाटील यांनी सर्व शिक्षकांचे तसेच वर्गमित्रांचे स्वागत केले. मुळे सरांच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर हाजी आलमगिर दाफ यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर पुढे सर्व शिक्षकाचे, बी आर पाटील, जे ए मुळे, बी एम शेख, टी बी पवार यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून आठवणींना उजाळा दिला. सर्जेराव माने यांनी सर्वांचे आभार मानले. आपल्या वर्गमित्र-मैत्रिणींना अनेक वर्षानंतर भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. अशा प्रकारे सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेऊन गेट टूगेदरची सांगता झाली