दिल्ली : संसदेत संविधानावर चर्चा सुरु असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही संसदेत संविधानावर चर्चा केली. तेव्हा राहुल गांधी यांनी अभय मुद्रेचा उल्लेख केला. आपलं संविधान विचारांचा एक समूह आहे. संविधान एक जीवन दर्शन आहे. संविधान आमचा एका सांस्कृतिक विचार आहे. संविधानात प्राचीन वारसा सामावलेला आहे” असं खासदार राहुल गांधी म्हणाले आहेत. आरएसएसने मनुस्मृतीला संविधानापेक्षा चांगलं ठरवल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. “सावरकरांनी सुद्धा संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचं स्थान दिलं होतं” असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की, ‘संविधानात आम्हाला बाबासाहेबांचे आदर्श दिसतात’असेही राहुल गांधी म्हटले.
राहुल गांधींनी आपल्या भाषणा दरम्यान द्रोणाचार्य आणि एकलव्यचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “जसा द्रोणाचार्यांनी एकलव्याच अंगठा मागितला, तसं तुम्ही हिंदुस्तानच्या युवकांचा अंगठा कापत आहात. देशातील सर्व उद्योग अदानीला दिले जात आहेत. देशातील उद्योगपतींचा अंगठा कापला जात आहे” असा खणखणीत आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला आहे. “भाजपला देशाची ताकद हिसकावायची आहे. शेतकऱ्यांऐवजी अंबानी, अदानी यांना फायदा पोहोचवला जात आहे. पेपरलीक सारख्या प्रकरणात युवकांचा अंगठा जातोय” असंही राहुल गांधी म्हणाले.