पुणे : शाळकरी मुलींचा पाठलाग करून त्यांच्याबरोबर अश्लील कृत्य करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी (दि. १२) उघडकीस आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात एका मुलीच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष आहे. तक्रारदारांची मुलगी आणि तिची मैत्रीण गुरुवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास शाळेत निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपीने मुलींना अडवले व त्यांच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मुलींनी आरडाओरडा केल्यनंतर आरोपी पसार झाला. घाबरलेल्या मुलींनी याबाबतची माहिती पालकांना दिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.