पुणे : पुणे येथील केंद्रीय विद्यालय, एनडीए येथे आता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. त्यात आता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पुण्यातील केंद्रीय विद्यालयात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (गणित आणि संस्कृत), शैक्षणिक समुपदेशक, विशेष शिक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://ndakhadakvasla.kvs.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (गणित आणि संस्कृत), शैक्षणिक समुपदेशक, विशेष शिक्षक.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 16 डिसेंबर 2024.
– मुलाखतीची पत्ता : पीएम श्री केंद्रीय विद्यालय N.D.A. खडकवासला पुणे – 411023.