शिरूर : ‘तुझ्या आई वडील व शेजाऱ्यांशी बोलायचे नाही’ असे म्हणत महिलेला सासू व पतीने मारहाण केली आहे. याबाबत मीना संदीप थोरबोले (वय २६ रा. वडगाव रासाई ता. शिरुर जि. पुणे, मुळ रा. वाटोडां ता. वरुड जि. अमरावती) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सासू उषा किसन थोरबोले व पती संदीप किसन थोरबोले यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव रासाई येथील मीना थोरबोले यांना तुझ्या आई-वडिलांशी व शेजऱ्यांशी बोलायचे नाही, असे म्हणत सासू उषा व पती संदीप थोरबोले यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आम्ही सांगू तसे वागली नाही, तर तुला मारुन टाकू अशी धमकीही दिली आहे. तसेच वडिलांकडून कार गाडी आणण्याचा तगादाही लावला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संपत खबाले हे करीत आहेत.