पिंपरी : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, माजी सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, दक्षिण भारत आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस विजय फुगे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, सुजाता पलांडे, शैला मोळक, मनोज तोरडमल, सुभाष सरोदे, कोमल शिंदे, धनराज बीरदा, दीपक नागरगोजे, सतीश नागरगोजे, मंगेश धाडगे, सचिन उदागे, गिरीष देशमुख, कैलास सानप, प्रमोद ताम्हणकर, संतोष मोरे, गणेश ढाकणे, हेमंत देवकुळे, समीर जावळकर, प्रशांत बाराथे, संजय परळीकर आदी उपस्थित होते.
माजी राज्यसभा खासदार अमर साबळे म्हणाले की, हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी बाबासाहेबांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळेच आज दलित समाज सुशिक्षित झाला. भारतीय संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेबांमुळेच आपल्याला शिका…संघटित व्हा आणि संघर्ष करा.. हा मूलमंत्र मिळाला.
शहराध्यक्ष महेश लांडगे यांची दिल्लीत आदरांजली…
भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या आवारात उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास वंदन केले. बैलगाडा शर्यतीच्या सुनावणीसाठी आमदार लांडगे दिल्लीत दाखल झाले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त लांडगे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली वाहिली.