गडचिरोली : येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वसंत कुळकर्णी यांच्या सुरक्षेसाठी तैनात सशस्त्र पोलीस पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या एके-४७ रायफलमधून गोळी झाडून गडचिरोली पोलीस दलात नेमणुकीस असलेल्या पोलीस हवालदाराने आत्महत्या केली. येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे एके-47 रायफलमधून धडाधड सुटलेल्या तब्बल 8 गोळ्यांच्या आवाजाने जिल्हा न्यायालयाचा परिसर हादरून गेला. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास न्यायालय परिसरात घडली. उमाजी होळी (४२) असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार उमाजी होळी बुधवारी प्रधान जिल्हा न्यायाधीश यांचे एस्कॉर्ट ड्युटीकरता कर्तव्यावर हजर होते. दुपारी २.५५ वाजताच्या सुमारास होळी हे जिल्हा न्यायालयाच्या आवारात वाहनात बसले असताना त्यांनी स्वतःच्या ताब्यातील स्वयंचलित हत्यार (बंदूक) हाताळत असताना गोळी झाडली. यात पोलीस हवालदार उमाजी होळी यांना ८ पैकी ३ गोळ्या छातीत लागल्याने जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. दुपारी लंच ब्रेकनंतर न्या. कुळकर्णी यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून जिल्हा न्यायालयात सोडल्यानंतर सुरक्षारक्षकांचे वाहन न्यायालयाच्या आवारात पार्क करण्यात आले होते.