शिक्रापूर: एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी परभणीमधून ताब्यात घेत अटक केली. दुर्गादास रेशीम मकर (रा. गंगाखेड, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथून २० जुलै २०२४ रोजी एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होते. याबाबत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे व पोलीस हवालदार प्रताप कांबळे या गुन्ह्याचा तपास करत असताना अपहरण झालेली मुलगी परभणी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी परभणी येथे जात मुलीसह त्याच्या सोबत असलेल्या दुर्गादास मकर याला ताब्यात घेतले.